
केंद्रीय मंत्री अमित शाह महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ३ मेला रत्नागिरीत
केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. यात आज २६ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा दुपारी १ वा. राजापूर येथील राजीव गांधी पटांगणावर होणार आहे तर १ मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सिंधुदुर्गमध्ये तर ३ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा रत्नागिरीत होणार असल्याची माहिती भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रमोद जठार यांनी दिली.www.konkantoday.com




