
७० टक्के मतांनी विजयी होणार नाहीतर राजकारणातून संन्यास घेणार -अनंत गीते
२०१९ च्या निवडणुकीत गीतेंना मत म्हणजे मोदीना मत, असे सांगून तटकरेंनी एकहाती मुस्लीम समाजाची मते घेतली. मात्र आज मोदींच्या मांडीवर जावून बसलेल्या तटकरेंना काहीही केले तरी मुस्लीम समाजाची मते मिळणार नाहीत. आता माझ्या समाजाची मते फोडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. पण त्यांच्या हाताला काहीच लागत नाही. तटकरेंकडे मते मागण्यासाठी मुद्दाच नसल्याने मते विकत घ्यावी लागतील. परंतु येथील मतदार पापाचा, शापाच्या पैशाला हात लावणार नाहीत. रायगड लोकसभा मतदार संघातून ७० टक्के मतांनी मी विजयी होणार आहे, असे झाले नाही, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सांगितले.गीते पुढे म्हणाले की, राहुल गांधी देशात पंतप्रधान झायाशिवाय राहणार नाहीत, त्यांच्यासाठी एक मत देण्याचा अधिकार असलेला खासदार म्हणून मला निवडून द्या, आज देशात मोदी विरूद्ध लाट आहे. आजपर्यंत शिवसेनेसोबत नसलेला मुस्लिम समाज आपल्यासोबत आला आहे. www.konkantoday.com