संगमेश्वरमध्ये महामार्गावर ठप्प पडलेली वाहतूक महिला पोलीस क्रांती सावंत यांनी केली पुर्ववत
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाजवळ मंगळवारी दुपारच्या वेळेस सिमेंट मिक्सर ट्रक अचानक बंद पडल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. या वेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र महामार्गावर ड्युटीवर असणार्या संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस क्रांती सावंत यांनी भर उन्हात खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक-एक वाहन पुढे सोडत वाहतूक कोंडी काही वेळेतच सोडवल्याने वाहन चालकांसह प्रवाश्यांनी जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या शरीरावर उन्हाचे चटके झेलत कर्तव्य पार पाडणार्या महिला पोलीस क्रांती सावंत यांचे आभार मानून पुढे मार्गस्थ झाले. www.konkantoday.com