
राजापुरातील उड्डाणपूल सर्व्हिस रोडचे काम अनेक वर्षे अर्धवटच, वाहनधारकांच्यात नाराजी
राजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाची बहुतांश कामे पूर्ण झाली असतानाच राजापूर एसटी डेपो समोरील पुलाच्या एका बाजूला रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पेट्रोलियमकडील सर्व्हिस रोडचेही काम अर्धवट असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.एसटी डेपो समोरील उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम पूर्ण करण्यात आले असल्याने याच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. तर दुसर्या बाजूच्या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रेंगाळत ठेवले असल्याने सध्या हा रस्ता मद्यपींचा ×अड्डा बनला आहे.www.konkantoday.com




