
खेड नगरपरिषद अग्निशमन बंब दुरूस्तीनंतर परत खेडमध्ये दाखल
खेड तालुक्याीतल चांदणीचौक येथे झालेल्या भीषण आगीत सिलिंडर स्फोटाच्या तांडवानंतर उसळलेला आगडोंब आटोक्यात आणताना येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबात तांत्रिक बिघाड झाल्याने दुरूस्तीसाठी चिपळूण येथे पाठवण्यात आला होता. अखेर १० दिवसानंतर अग्निशमन बंब मंगळवारी सायंकाळी उशिरा येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्रातील कर्मचार्यांनी ताब्यात घेतला. यामुळे नगरप्रशासनासह नागरिकांची चिंता दूर झाली आहे. www.konkantoday.com