
स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेकडे नववर्ष स्वागत ठेव योजनेत ६ कोटी ६७ लाखांच्या ठेवी जमा,ठेवीदारांनी विश्वासवृध्दी योजना मानून केली गुंतवणूक
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नववर्ष स्वागत ठेव योजनेची आज ३१ जानेवारी २०२० रोजी सांगता झाली. १ जानेवारी २०२० रोजी प्रारंभ झालेल्या नववर्ष स्वागत ठेव योजनेची ६ कोटी ६७ लाखांच्या ठेव संकलनाने आज सांगता झाली. या योजनेत ४५७ ठेवीदारांनी संस्थेत गुंतवणूक केली. स्वरुपानंद पतसंस्थेच्या पुण्यासह सर्व १७ शाखांमध्ये ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली.
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने २८ वर्ष आर्थिक क्षेत्रात विश्वासार्ह पध्दतीने काम केले आहे. शासनाने ठेवींच्या कमाल व्याजदराबाबत नुकतेच परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सदर मर्यादेचे उल्लंघन न करता आपले व्याजदर मर्यादेत ठेवून ठेवीदारांना महत्त्वाची असणारी सुरक्षितता स्वरुपानंद पतसंस्थेने शिस्तबध्द व प्रमाणबध्द आर्थिक व्यवहाराने निर्माण केली आणि या सुरक्षिततेमुळे मोठ्या प्रमाणावर ठेवीदार स्वरुपानंद पतसंस्थेच्या योजनांमध्ये आपली गुंतवणूक स्वरुपानंद पतसंस्थेत करतात.
आजच्या अस्थिर आणि मंदावलेलया अर्थचक्राच्या कालखंडातही स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने रु.६ कोटी ६७ लाखांच्या ठेवी संकलित करत पतसंस्थेच्या ठेवी १९५ कोटी ५० लाखांपर्यंत पोहोचवल्या. या वाढीव ठेव रकमेला साजेसा कर्ज वितरणाचा वेग ठेवतानाच ०% एनपीए राखत ९९% चे वर आपली वसुली सातत्याने राखली असून सर्व शाखांची सातत्याने १००% वसुली पतसंस्थेने केली आहे.
पतसंस्थेची सभासद ग्राहकसंख्या ३३ हजारच्या पुढे गेली असून इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकसंख्या असल्याने पतसंस्थेचा आर्थिक आधार आधिक विस्तृत झाला आहे. आर्थिक संस्थेसाठी हे शक्तीस्थान ठरत आहे.
ठेवीदारांनी ठेवलेला विश्वास अबधित ठेवत संस्थेची आर्थिक ताकद वाढवत ठेवणे यासाठी सतर्क राहून काम केले जाईल अनेकविध ठेवयोजना कर्जयोजना अन्य इलेक्ट्रोनिक सेवा सुविधा यांच्या माध्यमातून स्वरुपानंद पतसंस्थेचे कामकाज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवले जाईल असे संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले व सर्व ठेवीदारांचे मनापासून आभार मानले आहेत.