इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भातील कोर्टाने सर्व याचिका रद्द ठरवल्या.
इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भातील कोर्टाने सर्व याचिका रद्द ठरवल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकेद्वारे मतदान आणि व्हीव्हीपॅटशी ताडून गणना करण्याची याचिका रद्द ठरवल्या आहेत.न्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले, “आम्ही दोन निर्देश दिले आहेत. त्यातला पहिला निर्देश म्हणजे चिन्ह लोड झाल्यावर सर्व युनिट सिल करावं आणि चिन्ह स्टोअर युनिटला किमान 45 दिवस ठेवलं जावं.””लोकशाहीत सामंजस्य राखलं पाहिजे, निवडणूक प्रक्रियेवर भरवसा न ठेवणं संशय निर्माण करू शकतं” असंही कोर्टानं म्हटलं.व्हीव्हीपॅट स्लिपवर पक्षाचं चिन्ह आणि उमेदवाराचं नाव छापण्यासाठी लोडिंग युनिटचा वापर होतो. गेल्यावर्षी निवडप्रक्रियेत पारदर्शकता वाढावी यासाठी आणखी एका सोयीची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. यामध्ये पेपर ट्रेल मशीनवर चिन्ह लोड करण्याच्या प्रक्रियेत एक व्हिज्युअल डिस्प्ले जोडला गेला होता.कोर्टाच्या निर्णयानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणाले, “ईव्हीएममध्ये जी मेमरी असते त्याच्यात फेरफार होऊ शतो असं आमचं म्हणणं होतं. म्हणूनच व्हीव्हीपॅटची तपासणी गरजेची आहे. जी रिसिट मिळते ती मतपेटीत टाकून त्याची गणना केली पाहिजे. व ताडून पाहिलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या याचिका फेटाळल्या आहेत. निवडणूक आयोगानं याची तपासणी करावी सर्व मतपत्रिकांवर बारकोड टाकला तर त्याची यंत्राद्वारे गणना होऊ शकते का हे पाहावं असं ही कोर्टानं म्हटलं आहे.”www.konkantoday.com