
आता दुचाकी नव्हे तर हर्णे बंदर येथून दोन फायबर बोटीची चोरी
दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथून सुमारे 3 लाख रुपये किंमतीच्या 2 फायबर बोटी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना 4 मे रोजी रात्री 12.30 ते 3 च्या मुदतीत घडली.दापोली पोलिसांच्या माहितीनुसार, हसन्मिया हिषामुद्दिन साखरकर (76) यांनी हर्णे बंदर येथे आपली फायबर होडी अल एशाई व इब्राहिम अली पांगळे यांची फायबर होडी त्यावर विजय गणेश असे लिहिलेले होते. या बोटी अज्ञात इसमाने चोरून नेल्या. या बोटींमध्ये ओबीएम मशीनही होते. या दोन्ही होड्या कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून घेऊन गेल्याची फिर्याद हसनमिया साखरकर यांनी दापोली पोलिसात दिली. दोन्ही होडीची अंदाजे किंमत ३ लाख रुपये आहे. हसनमिया साखरकर यांच्या फायबर होडीवरत एशाई लिहिले असून होडीचा क्रमांक IND MH-4-MM 4992 असा आहे. या होडीत ओबीएम मशीन असून होडीची अंदाजे किंमत 1 लाख 50 हजार रुपये आहे. इब्राहिम पांगळे यांच्या होडीमध्ये ओबीएम मशीन असून त्यावर विजय गणेश असे लिहिले आहे. या होडीची किंमत सुमारे 1 लाख 50 हजार आहे. www.konkantoday.com