रायगड लोकसभेच्या महायुतीच्या प्रचारात मनसेचा अजून उत्स्फूर्त प्रतिसाद नाही
रायगड लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देवूनदेखील तसेच कोकणातील नाराज मनसेच्या पदाधिकार्यांची समजूत काढल्यानंतरसुद्धा उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात मनसे सैनिक दिलसे अजूनही प्रचारात उतरलेली पहायला मिळत नाही. आतापर्यंतच्या जाहीर सभांमध्ये देखील कोठेही मनसेचे पदाधिकारी व्यासपीठावर नसल्याने कोकणातील मनसे अजून दिलसे नाही, अस बोलले जात आहे.www.konkantoday.com