गेल्या तीन दिवसांपासून मंडणगडात इंधन टंचाई
गेल्या तीन दिवसांपासून मंडणगडात इंधन टंचाईने डोके वर काढले आहे. शहरातील सर्व पंपांवर एकाच वेळी समस्या निर्माण होत असल्याने कोणताही पर्याय शिल्लक रहात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे नागरिकांना दापोली, खेड, महाड, गोरेगाव या चाळीस किलोमीटरचे अंतरातीलल शहरे गाठावी लागत आहेत. यासाठी प्रसंगी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.गेल्या दोन हंगामात एप्रिल व मे महिन्यात मंडणगड शहरात इंधन तुटवड्याच्या समस्येची तीव्रता वाढताना दिसून आलेली आहे. www.konkantoday.com