*कोकणातील कांदळवनाचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण होणार
कोकण किनारपट्टीलगत असलेलला कांदळवनांच्या हिरव्या पट्ट्यात जमिनीच्या व्यावसायिक हव्यासापाटी होत चाललेली अतिक्रमणे रोखण्यासाठी या क्षेत्रांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.त्यानुसार राष्ट्रीय कांदळवन कक्षाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरला (एमआरएसएसी) कोकणातील सात जिल्ह्यांत कांदळवन क्षेत्रांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या ‘ग्रीन बेल्ट’चा पर्यटनीय आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.कोकणातील कांदळवनांच्या क्षेत्रात असंख्य जीवांचा अधिवास आहे. कोकणात असलेला हा ठेवा आता पर्यटनाच्या द़ृष्टीनेही विकसित होत आहे. अनेक ठिकाणी खारफुटीच्या जंगलात नौकाविहार, पक्षीनिरीक्षण आदी पर्यटन विकसित करणारे घटक आहेत. त्याचबरोबर या जंगलात स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी अनेक उपजीविकेची साधने निर्माण करण्यात येत आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक प्राधिकरणे कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरण करण्यास चालढकल करत आहेत.www.konkantoday.com