नागपुरात पुन्हा मतदान घ्या : अपक्ष उमेदवारांची संयुक्तपणे मागणी!

*१९ एप्रिल रोजी नागपूर मतदार संघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदानाने प्रमुख राजकीय पक्षांची चिंता वाढलेली असताना मतदारयादीतील गोंधळ ७ लाख मतदार मतदानापासून वंचित झाल्याने अनेक अपक्ष उमेदवारांनी आज बुधवारी संयुक्तपणे पत्रपरिषदेत संताप व्यक्त केला. नागपुरात पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली.शासन,प्रशासन घोळात निवडणुकीवर सामान्य जनतेचा विश्वास उरलेला नाही हे या निवडणूकीतून स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आचारसंहितेच्या कलम १२६ चे खुलेआम उल्लंघन केले त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करा, पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी सामूहिकरित्या लोकसभेच्या रिंगणात असलेल्या या उमेदवारांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली. गडकरी यांच्याकडून आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन केले गेले याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडेही करण्यात आली.१९ एप्रिल रोजी नागपुरात लोकसभा निवडणूक होती, त्या दिवशी यातीलच काही उमेदवारांनी बूथची पाहणी केली असता, बूथवर बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून मतदारांना एक स्लिप तयार करून वाटली जात होती, त्या स्लिपवर नितीन गडकरींचा फोटो आणि कमळाच्या फुलाचे चित्र होते. एकप्रकारे प्रचार संपल्यावरही मतदारांना डिजिटली प्रचारातून कमळाच्या फुलाचे बटण दाबण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. नागपूर शहरातील अनेक बूथवर खुलेआम हा प्रकार घडत असल्याचे पाहून त्यांनी तत्काळ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र यश न आल्याने काही उमेदवारांनी बूथवर चालणारी मशीन सोबत नेली तर काहींनी फोटो काढले, यासोबतच व्हिडिओही काढण्यात आले. संपूर्ण नागपूर शहरात हा प्रकार उघडपणे दिसला, हा व्हिडीओ आणि फोटो अनेक ठिकाणांहून अनेक उमेदवारांनी काढले, तसेच अनेकांची पत्रेही जमा करण्यात आली, ४ मशीन जप्त करण्यात आल्याचा आरोप केला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button