खेड तालुक्यातील भरणेतील प्रौढाचा विष प्राशनाने मृत्यू
खेड तालुक्यातील भरणे येथील ५० वर्षीय प्रौढाचा विष प्राशनानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनीराम थापा असे मृत प्रौढाचे नाव आहे. १० एप्रिल रोजी विषप्राशन केल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर बनल्याने रत्नागिरी येथील शासकीय रूग्णाललयात दाखल करण्याात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com