गळफास लावून आत्महत्या केलेल्या इसमाचे प्रेत पोलिसांनी चक्क सरणावरून नेले शवविच्छेदनासाठी
क्षयरोग (टीबी) आजाराला कंटाळून ६६ वर्षीय इसमाने गळफास घेतला. यावर घरच्यांची कोणतीच तक्रार नसल्याने त्यांच्या अंत्यविधीची तयारी करून मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेला गेला. मृतदेहाला सरणावर ठेवले एवढ्यात गुहागर पोलिसांचा फौजफाटा घेवून मृतदेह चक्क सरणावररून उचलून रूग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी नेल्याची घटना गुहागर तालुक्यातील जानवळे गावात घडली.विजय कृष्णा पोतदार (६६, रा. जानवळे, वाडीवाडी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. विजय पोतदार यांनी २१ रोजी ११.३० ते २२ रोजी पहाटे ३.३० च्या मुदतीत आपल्या राहत्या घरातील पडवीतील लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत त्यांच्या दोन्ही मुलांना, पत्नी, भाऊ तसेच घरातील कोणाचीच तक्रार नव्हती. मात्र पोलिसांकडे कोणीतरी संशय व्यक्त केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे www.konkantoday.com