
हापूस नाव वापरणार्या नर्सरी व्यावसायिकांवर होणार कारवाई -मुकुंदराव जोशी
नोंदणीशिवाय हापूस हे नाव व्यावसायिक कामासाठी वापरणे, हे अनुचित ठरवण्यात आले आहे. सध्या अनेक नर्सरी व्यावसायिक हापूस कलमे म्हणून बाजारात आंबा कलमांची विक्री करत आहेत. सक्षम संस्थांकडे नोंदणीशिवाय अशी विक्री वैध ठरणार नाही जे नर्सरी व्यावसायिक हापूस म्हणून आंबा कलमांची विक्री करतील त्यांच्याविरूद्ध खटले दाखल करण्याची कारवाई पुढील टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे सचिव मुकुंदराव जोशी यांनी दिली.ते म्हणाले, आमची संस्था ५ जिल्ह्यांसाठी हापूस आंबा नोंदणीसाठी प्राधिकृत करण्यात आली आहे. ज्या लोकांना आंबा कलमे हापूस म्हणून विक्री करायची आहे, अशांनी हापूस नाव वापरण्यासाठी आमच्या संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बौद्धिक संपदा कायद्याप्रमाणे कशी कार्यवाही अपेक्षित आहे. नोंदणी न करता हापूस म्हणून विक्री करणे हे गैर आहे. ते पुढे म्हणाले, नर्सरी उद्योजकांनी कारवाई टाळण्यासाठी हापूस नावनोंदणीसाठी आवश्यक ती पावले उचलावीत अन्यथा कायदाभंग करून विक्री करणार्या लोकांविरूद्ध पावले उचलावी लागतील.www.konkantoday.com