
रत्नागिरी शहरातील बेलबाग येथे एका घरात आढळला हजारोंचा गुटखा-पानमसाला
रत्नागिरी शहरातील बेलबाग येथे घरामध्ये ६० हजार रूपयांचा गुटखा-पानमसाला बाळगणारर्या संशयिताविरूद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.रियाज इक्बाल मुन्सी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील बेलबाग येथे घरातून गुटखा पानमसाल्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २२ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास पोलिसांकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली. यामध्ये २१ हजार ७८० रुपयांचा विमल केसरयुक्त पानमसाला, ३ हजार ३३८ रुपयांचा व्ही एक तंबाखू, १९ हजार ४४८ रुपयांचा विमल केसरयुक्त जांभळ्या पाकिटमधील पानमसाला, १२ हजार रुपयांचा विमल इलायची पानमसाला आढळून आला. या प्रकरणी रियाजविरूद्ध भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८ अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com