रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेल्या चार बांग्लादेशींना न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाने चिपळूण शहरातील रावतळेसह मार्कंडी येथून अटक केलेल्या ४ घुसखोरी बांग्लादेशींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कोठडी संपली असताना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.रूखसाना आलमगीर मंडल, आलमगीर अरबली मंडल, महंमद हसन आली, असाद कामरू जवान सिरीना अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी मंडल या दांपत्याला रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाने रावतळेतून अटक केली होती. तसेच महंमद अली, असाद सिरीना या तरूणांना मार्कंडी येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतीतून अटक केली होती. मंडलसह महंमद आली असाद सिरीना पश्चिम बंगालमार्गे महाराष्ट्रात आल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. www.konkantoday.com