
भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे उद्घाटन संपन्न.
रत्नागिरी येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचालित श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडले.या रुग्णालयाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असून, माझ्या मतदारसंघात हे हॉस्पिटल उभारल्याबद्दल मा. श्री. निलेश सांभारे यांचे मी मनापासून आभार मानतो, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळेच रत्नागिरीतील शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरीत उभं राहिलं, राज्यातील पहिलं वातानुकूलित वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत ५०० कोटींच्या निधी मिळाला. ७२ हजार रुग्णांचे प्राण शिंदे साहेबांच्या तत्पर निर्णयामुळे वाचले – हेच त्यांचं रुग्णांप्रती असलेलं निःस्वार्थ सेवाभावाचं उदाहरण असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण भैय्या सामंत, माजी आमदार राजन साळवी, तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.