टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरातून मोठे कौतुक ,पदके मिळवणार्‍या खेळाडूंवर बक्षिसांची बरसात neeraj chopra olympics gold medal

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरातून मोठे कौतुक होत आहे. भारतात पहिल्यांदाच ॲथलेटमध्ये निरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून दिले. नीरज पाठोपाठ भारतासाठी दोन सिल्वर आणि चार कांस्य पदके मिळवली आहेत. या सर्व खेळाडूंवर बक्षिसांची बरसात होत आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ६ कोटी तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नीरजला २ कोटींचे रोख बक्षीस जाहीर केले. याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेल्या इतर खेळाडूंसाठीही बक्षिसांची घोषणा करण्यात आली.महिंद्रा ग्रुपचे मालक आनंद महिंद्रा यांनी निरजला एसयूव्ही गाडी भेट देण्याची घोषणा केली.बीसीसीआय आणि चेन्नई सुपर किंग्सकडून चोप्राला प्रत्येकी एक कोटींचे बक्षीस जाहीर केले. बीसीसीआयने इतर पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना रोख बक्षिसांची घोषणाही केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटद्वारे सांगितले ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू आणि रवी दहिया यांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्यात येणार आहे. तर कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॉक्सर लवलिना बारगोहेन आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा शहा यांनी केली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button