रत्नागिरीनजिकच्या कुवारबांव येथे रस्त्याकडेचा ट्रेलर घसरला..
रत्नागिरीनजिकच्या कुवारबांव येथे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर साईडपट्टीवरून चालकाच्या हलगर्जीपणामुळे एक ट्रेलर घसरला ज्या ठिकाणी अपघात घडला. त्या घटनास्थळी या महामार्गाच्या साईडपट्टीवर विनापरवाना छोट्या व्यावसायिकांनी मांडलेले ठाण व खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित वाहतूक पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायती यांनीही गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी कुवारबाव व्यापारी संघ कुवारबांव/मिरजोळे यांनी केली आहे.कुवारबांव येथील समता हॉटेलसमोर महामार्गावर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास हा अपघात घडला.सुदैवाने दुपारच्यावेळी येथे गर्दी नसल्याने होणारा मोठा अनर्थ टळला.सध्या रत्नागिरी-नागपूर या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. कुवारबांव येथे या महामार्गावर दोन्ही बाजूने तीव्र उताराचा भाग आहे. अशा मार्गावर साईडपट्टीवर सोमवारी दुपारी मोठा ट्रेलर घसरून अपघात घडला. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. www.konkantoday.com