खेडमध्ये आढळल्या ५०० रुपयांच्या तीन बनावट नोटा
खेड बाजारपेठेत ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी भरणे येथील एका पेट्रोल पंपात ५०० च्या ३ बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बनावट नोटा नेमक्या आल्या कुठून, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर आहे. २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर ५०० रुपयांच्याच नोटा सर्रासपणे चलनात वापरण्यात येत आहेत. ग्राहकांकडून मिळणार्या नोटा बनावट की खोट्या याची प्रत्येक व्यापार्याकडून चाचपणी केल्यानंतरच स्वीकारल्या जात आहेत. बँकांमध्येही नोटांची तपासणी करून ५०० च्या नोटा स्विकारण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी नोटांची तपासणी केली जात नसल्याची संधी साधत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.www.konkantoday.com