
फटाके फोडून मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्यांविरोधात कारवाई;
काही दिवासांपासून मुंबईसह दिल्ली शहरत वायू प्रदूषण वाढलं आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यात दिवाळी आल्यानंतर फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
त्यामुळे उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी निर्बंध घातले होते. रात्री ८ ते १० या वेळेपेक्षा अधिक वेळ फटाके फोडणाऱ्यां कारवाई केली जाईल अशी ताकीद मुंबई उच्च न्यायालयाने दिली होती.
उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानंतर, मुंबई पोलिसांनी रात्री ८ ते १० या वेळेपेक्षा अधिक फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आलीय. यात एकूण ७८४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ज्यात ८०६ जणांवर गुन्हेगारी कारवाई करण्यात आलीय. तर ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा प्रदूषित झाली होती.
www.konkantoday.com