अश्मयुगीन कातळशिल्प माहितीपट रत्नागिरीत झळकणार

कोकणातल्या कातळखोद चित्रांबाबत तयार करण्यात आलेली पहिली डॉक्युमेंट्री अर्थात माहितीपट स्टोन अँड एज अर्थात अश्मयुगीत कातळशिल्प यांचे शनिवार २७ एप्रिल रोजी पहिले सादरीकरण होणार आहे. अश्मयुगीन कातळशिल्प या विषयावर आधारित माहितीपाटतून कातळशिल्पांचा शोध आणि या कातळशिल्पाचा पसारा किती मोठा आहे याची कल्पना देण्याचा प्रयत्न निर्माते व दिग्दर्शक विवेक वाघ यांनी केला आहे.कोकणातल्या बहुतांशी कातळसड्यावर सापडलेली २ हजारापेक्षा अधिक कातळशिल्पांबाबत आता सगळ्यांनाच कुतूहल वाटत आहे. ही कातळशिल्प नक्की कोणी कोरली? का कोरली? कशाला कोरली? कशाने कोरली? ही माणसं कोण होती? कुठे रहात असावीत? एवढी मोठी चित्र का कोरली? वगैरेवगैरे अनेक प्रश्‍न आता सगळ्यांच्याच मनात येत आहेत. याच चित्रांबाबतच्या कुतुहलातून निर्माते, दिग्दर्शक विवेक वाघ व निर्माते, दिग्दर्शक विवेक वाघ व निर्माते प्रतिक जोशी रत्नागिरीत आले. त्यांनी निसर्गयात्री संस्थेला भेट दिली.कोकणातल्या या अदभूत कलाकृती पाहून त्यांचीही उत्सुकता वाढली. याच उत्सुकतेतून या कातळशिल्पावर आधारित डॉक्युमेंटरी अर्थात माहितीपट करायची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.या माहितीपटाचे पहिलं स्क्रिनिंग रत्नागिरीत होणार आहे. २७ एप्रिल रोजी निऑन रील क्रियेशनद्वारा निर्मित व विवेक वाघ दिग्दर्शित निसर्गयात्री संस्थेच्या सहकार्याने या माहितीपटाचे पहिले सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button