
मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात बारावीचा, तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता
महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे.दहाव, बारावीच्या निकालाचा महाराष्ट्रातील निवडणूक निकालाशी संबंध जोडला जात आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकांचे निकाल जूनमध्ये जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे हे निकाल लागण्याच्या आधी दहावी-बारावीचे निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल पुढच्या महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. आधी बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी सोपे होणार आहे. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात बारावीचा, तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. www.konkantoday.com