दापोली-दाभोळ रस्त्यावर दोन किलो गांजा पकडला

दापोली-दाभोळ रस्त्यावर पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ एका चारचाकीमध्ये दोघेजण दोन किलो गांजासह आढळून आले असून रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई कीत सुमारे ३ लाख ६९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काल बुधवार दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मकसुद जाफर पावसकर (५४, रा. कोकंबाआळी, दापोली, मुळ रा. हर्णे नवानगर) व साहील अकबर पठाण (२० रा. मच्छिमार्केट, दापोली) हे दोघे आपल्या ताब्यातील चारचाकी (क्र. एम.एच. १४ एफएस ७३१६) मध्ये २ किलो १३४ ग्रॅम गांजा या अंमली पदार्थासह पोलिसांना आढळून आले. याची किंमत सुमारे ४२ हजार ६८० रुपये इतकी आहे. रत्नागिरी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button