महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार ६९० सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट
शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी, अधिकाधिक पिके घेण्यासाठी पाणी ही सर्वांत मोठी गरज आहे.त्यामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार ६९० सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वैयक्तिक स्तरावर सिंचनाचे स्रोत शेतकऱ्यांकडे असावेत आणि सिंचनाबाबत शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी मनरेगातून हे उद्दिष्ट देण्यात आले आहे.शेतकरी आपल्या शेतात या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतात तसेच या योजनेंतर्गत विहिरींच्या कामासाठी १०० दिवसांचा मनुष्यबळाचा खर्च केंद्रस्तरावर तर अतिरिक्त लागणारा दिवसाचा मनुष्यबळाचा खर्च राज्यस्तरावर देण्यात येणार आहे. या योजनेमुळे खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामातही लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोबर केवळ पावसाच्या पाण्यावर चालणाऱ्या शेतीबरोबरच उन्हाळ्यातही सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेतwww.konkantoday.com