
दापोलीत पत्रकारिता अभ्यासक्रम करिअरसाठी उपलब्ध
दापोली ः पत्रकारितेच्या चमकदार क्षेत्रातील मुंबई विद्यापीठाचा बॅचलर ऑफ मास मिडिया अर्थात बी.एम.एम. अभ्यासक्रम इ. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येथील रामराजे महाविद्यालयात उपलब्ध आहे. अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे.
या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून या विभागाच्या प्रमुख प्रा. वेदिका राणे यांच्याशी विद्यार्थ्यांनी वा पालकांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.