चिपळूण नगर परिषदेने राबवलेली शहरातील भटक्या श्वानाची नसबंदी मोहीम फत्ते
चिपळूण नगर परिषदेने राबवलेली शहरातील भटक्या श्वानाची नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम फत्ते झाली आहे. सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन कोल्हापूर यांनी ५०० कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया केली असून यासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च आला आहे. गेल्या २ वर्षात ४ वेळा ही मोहीम राबविली गेल्याने त्याचा चांगला परिणाम जाणवत असून सध्या श्वानांची उत्पती कमी झाली आहे.काही वर्षे मागे जाता शहरात कायमच भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत होती. त्यामुळे बरीच कुत्री पिसाळून नागरिकांवर विशेषतः लहान मुलांवर हल्ले करीत होती. याला बरीच कारणे होती. त्यातील शहरातील विविध भागात टाकले जाणारे चिकन, मटण, मच्छिचे टाकावू अवशेष खाल्ल्याने ती अधिक पिसाळत होती. त्यामुळे नगर परिषदेने टाकावू अवशेष उघड्यावर टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा व्यावसायिकांना दिला. त्यामुळे आता हे अवशेष नदीपात्रात तसेच उघड्यावर टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर दुसरीकडे नागरिकांवरील हल्ले टाळण्यासह श्वानांच्या संख्येत घट करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेने ही नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. www.konkantoday.com