
फिडे ऑनलाइन नियमावलीनुसार दक्षिण महाराष्ट्रातील पहिलीच स्पर्धा : गुजरातचा कर्तव्य, सोलापूरचा मानस, आसामचा ह्रिदांत, दिल्लीचा शश्विन आणि हरियाणाचा सिद्धांत विविध गटांत विजेते
रत्नागिरी : चेसमेन रत्नागिरी व केजीएन सरस्वती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जेएसडब्लू फाउंडेशनच्या सहकार्याने नुकत्याच पार पडलेल्या कै.रामचंद्र सप्रे स्मृती खुल्या व वयोगटातील ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिका, फिलिपिन्स, नेपाळ, श्रीलंका, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, नॉर्वे, श्रीलंका आणि भारतातील २० राज्यातील एकूण ५४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे हे सलग ११ वे पर्व असून गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी सदर स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियमांचे पालन करत आयोजित करून आपला नावलौकिक राखला असून भविष्यात आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धा अयोजित करण्याचा मानस असल्याचे पहिल्या स्पर्धेपासून स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ असलेल्या कऱ्हाडे ब्राम्हण संघ आणि के जी एन सरस्वती फाउंडेशनच्या माधव हिर्लेकर यांनी सांगितले.
स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी अखिल भारतीय महासंघाचे पदाधिकारी व रामभाऊंचे सहकारी खेळाडू ए के रायझदा, अखिल भारतीय पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मेंद्र कुमार, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, केजीएन सरस्वती फाउंडेशनचे माधव हिर्लेकर, जिंदाल फाउंडेशनच्या वतीने अनिल दाधिच तर चेसमेन रत्नागिरीचे दिलीप टिकेकर तर सप्रे कुटुंबियांच्या प्रातिनिधिक स्वरूपात शुभांगी पोळ उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी सप्रे यांच्या कार्याला अभिवादन केले आणि त्यांना आदरांजली वाहिली. सौ. पोळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रामभाऊंच्या कार्याचा आढावा घेतला. तर टिकेकर यांनी आभार मानले.
सदर स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या ऑनलाइन नियमावलीनुसार झालेली दक्षिण महाराष्ट्रातील पहिलीच स्पर्धा होती आणि ह्या स्पर्धेत संपूर्ण भारतभरातून ३० पंचांनी खेळाडूंच्या तांत्रिक बाबींचे परीक्षण केले. आंतरराष्ट्रीय पंच स्वप्नील बनसोड, आनंद बाबू, नितीन शेणवी, प्रवीण ठाकरे, मंगेश गंभीरे व अजिंक्य पिंगळे यांच्यासह रत्नागिरीच्या चैतन्य भिडे, मंगेश मोडक व विवेक सोहनी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पंच कमिटीने विनातक्रार स्पर्धा पार पाडून खेळाडू व पालकांची वाहवा मिळवली.
स्पर्धेचा विस्तृत निकाल खालीलप्रमाणे :
चौदा वर्षांखालील गटातील विजेते
मानस गायकवाड, साहिब सिंग, हलदर स्नेहा, बिजॉय अर्पित, अद्वैत प्रवीण, राजसिंग स्नेहिल, अरविंद अय्यर, अनिरुद्ध बालिगा, क्षितिज दत्ता, शंतनू पाटील
चौदा वर्षांखालील मुली :
अस्मिता अविजित रे, दक्षिता कुमावत, अमृता वर्षािणी दामिसेट्टी
चौदा वर्षांखालील सर्वोत्तम रत्नागिरी खेळाडू :
विराज खामकर, ज्योतिरादित्य गडाळे
बारा वर्षांखालील गटातील विजेते
शर्मा हृदंत, खंडेलवाल कुशाग्र, अंश नंदन नेरुरकर, आदित्य भार्गव, शरणार्थी विरेश, विवान सचदेव, जय सावळाखे, संस्कार गायगोरे,
राजबोंशी तन्मय, सिन्हा अलौकिक
बारा वर्षांखालील मुली :
हिप्परगी श्रेया, घोष सापर्या, शोम आदित्री
बारा वर्षांखालील सर्वोत्तम रत्नागिरी खेळाडू :
निधी मुळ्ये, पद्मश्री वैद्य
दहा वर्षांखालील गटातील विजेते:
ए के शशवीन, बागुल आराध्या, रितेश मद्दुकुरी, आदिक थेओफेन लेनिन, रंजितकुमार मिथिलेश, एस मधेश कुमार, अद्विक सिंग चौहान
अयान गर्ग, बडोले शौनक, बालनंदन अय्यप्पन
बारा वर्षांखालील मुली :
ठाकर अन्विता, माथुर आरोही, यू श्रुती
दहा वर्षांखालील सर्वोत्तम रत्नागिरी खेळाडू :
देवांशी पाटील
आठ वर्षांखालील गटातील विजेते:
सिद्धांत राणा, व्योम मल्होत्रा, विहान अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, निरव शहा, वैराज सोगिरवाल, अशोक समक्ष, आरव धूत, अर्जुन सिंग, राहुल रामकृष्णन
वर्षांखालील मुली :
रिशिथा नारायणन, भूमिका वाघळे, त्वेषा जैन
उत्तेजनार्थ : अथर्व सिंग, अयन जमवाल
www.konkantoday.com