चिपळूणमधून राणेंना मोठे मताधिक्य देऊ, आमदार निकम यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्यांचा निर्धार
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा चिपळूण शहराातील प्रचारफेरीचा शुभारंभ रविवारी सकाळी चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थानासमोर आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार निकम यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्यांनी राणे यांना चिपळूण-संगमेश्वरमधून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला.जय भवानी, जय शिवाजी, कालभैरवाचा विजय असो, महायुतीचा विजय असो, जय श्रीराम, अब की बार ४०० सो पार, अशा घोषणा देत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आमदार निकम म्हणाले की, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह पाहता उमेदवार राणे यांच्या विजयाची ही नांदी आहे. राणेंना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कर्तव्य असणार आहे. जुना कालभैरवसमोर शब्द देतो की, आम्ही सर्वजण एकत्रितपणे चिपळूण-संगमेश्वरमधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही दिली. माजी आमदार चव्हाण म्हणाले की, महायुतीचे आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करणार आहोत. उमेदवार राणे यांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यानिमित्ताने आम्ही कला आहे.www.konkantoday.com