
ठाकरे गटाचा एक महत्त्वाचा नेता शिंदे गटाच्या गळ्याला लागणार
*शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होतात ठाकरे गटाचा एक महत्त्वाचा नेता शिंदे गटाच्या गळ्याला लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचे राजकारण दिवसेंदिवस रंजक होत चालले आहे.नाशिक मतदारसंघातील उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटाच्या अन्य इच्छुकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आले नाही. त्यामुळे येथे एक दोन दिवसांत उमेदवारी न मिळालेले विजय करंजकर शिंदे गटात प्रवेश करण्याची विश्वसनीय माहिती आहे.www.konkantoday.com