
यवतमाळ राळेगाव येथील प्रचारसभेदरम्यान मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात इसमाने दगड भिरकावला
* यवतमाळ राळेगाव येथील प्रचारसभेदरम्यान मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात इसमाने दगड भिरकावला. ही घटना आज सायंकाळी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान घडली. लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याचं मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. दुसर्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे, यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणुकीआधीचा शेवटचा रविवार असल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते सभा घेण्यावर भर देत आहेत. यवतमाळमध्येही महायुतीची प्रचार सभा आहे, या सभेवेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगड फेकण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळमध्ये सभेसाठी आले आहेत. फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंतही आहेत, यावेळी अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावून उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीची काच फुटली आहे. राळेगावमधील प्रचारसभेवेळी ही घटना घडली आहे.www.konkantoday.com