कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण ते करंजाडी दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक
प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार, करंजाडी – चिपळूण विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी हा मेगा ब्लॉक चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी (ता.२३) दुपारी एक ते सायंकाळी ३.४० दरम्यान हा अडीच तासांचा मेगा ब्लॉक असेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली. यामुळे मार्गावरील काही रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. गाडी क्र.०२१९७ कोईम्बतूर ते जबलपूर या गाडीचा प्रवास २२ एप्रिल रोजी रत्नागिरी – कामठे स्थानकांदरम्यान ७० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेसचा २३ एप्रिलला सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड ते रत्नागिरी स्टेशन दरम्यान एक तास चाळीस मिनिटांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) ते तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास २३ एप्रिलला कोलाड ते वीर स्टेशन दरम्यान ५० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.www.konkantoday.com