
आता ८५ वर्षांखालील वृद्धांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जावे लागणार
केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर निवडणूक आचार नियम (1961) मध्ये सुधारणा केली आहे. केंद्र सरकारने पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची वयोमर्यादा 80 वरून 85 वर्षे केली आहे.म्हणजेच आता ८५ वर्षांखालील वृद्धांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. यापूर्वी 80 वर्षांवरील वृद्धांना पोस्टल बॅलेटची सुविधा होती.केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर शुक्रवारी निवडणूक आचार नियम (1961) मध्ये सुधारणा केली. गेल्या 11 विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठांच्या मतदानाचा पॅटर्न लक्षात घेऊन सरकारने हा बदल केला आहे. या निवडणुकांमध्ये 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 97 ते 98 टक्के वृद्धांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याऐवजी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणे पसंत केले. हे लक्षात घेऊन सरकारने 2020 मध्ये केलेल्या या तरतुदीत सुधारणा केली आहे.www.konkantoday.com