
एक हजार डॉक्टरांचा गुहागरात मेळावा
*महाराष्ट्र होमिओपॅथीक परिषद मुंबई व रत्नागिरी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन यांच्यावतीने रविवारी ( ता.२८) गुहागर येथील टेल वूड्स येथे कोकण विभागीय होमिओपॅथिक डॉक्टर्स मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिदुधुर्ग जिल्ह्यातील सुमारे १ हजार होमिओपॅथिक डॉक्टर्स उपस्थित राहणार आहे. मेळाव्यासाठी डॉ. रजनीताई इंदुलकर, डॉ. विलास हरपाले, डॉ. बाहुबली शाह, डॉ. सुनील मुळीक, डॉ. नितीन गावडे, डॉ. दीपक जगताप, डॉ. हिरालाल अग्रवाल आदी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाकडे (NCH) यांच्याकडे सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी अद्ययावत करणे, होमिओपॅथिचा प्रचार -प्रसार, विकास व संशोधन, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेच्या नियमांची व पुढील कार्यक्रमाची माहिती देणे या प्रमुख उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. होमिओपॅथिचे ज्ञान अद्ययावत होण्यासाठी होमिओपॅथिक तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याकरिता कोकण विभागातून जास्तीत जास्त होमिओपॅथिक डॉक्टरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभागीय होमिओपॅथिक डॉक्टर्स मेळावा कार्यकारणी समिती यांनी जाहीर आवाहन केले आहे. www.konkantoday.com