वर्षभरात कोकण रेल्वेने ‘रो-रो’ सेवेतून तब्बल 32 कोटी 98 लाखांचा गल्ला जमवला

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेची मालवाहतुकीची सेवा रेल्वेसाठी दुवाच ठरली वर्षभरात कोकण रेल्वेने ‘रो-रो’ सेवेतून तब्बल 32 कोटी 98 लाखांचा गल्ला जमवला. 14 हजार 21 मालवाहतूक टकच्या 344 फेऱ्यांतून रेल्वे प्रशासनाची केली भरघोस कमाई प्रदूषणमुक्त अन् सुरक्षित सेवेमुळे ‘रो-रो सेवेला सर्वाधिक पसंती मिळत आहे. ‘रोल ऑन रोल ऑफ सेवा’ हा मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगळा मार्ग तयार करण्यात कोकण रेल्वे कमालीची यशस्वी ठरली आहे. कोकण रेल्वेने 26 जानेवारी 1999 मध्ये ‘रो-रो’ सेवेला प्रारंभ केल्यानंतर सुरूवातीच्या काळातमालवाहतुकीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र गेल्या 25 वर्षात सरासरी 8 लाख टक ‘रो- रो’ सेवेच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यात आले ‘रो-रो’ सेवेच्या माध्यमातूनकोकण रेल्वेला गेल्या 3 वर्षात 200 कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button