रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची पर्स लांबवून अज्ञाताने लाखोंचा ऐवज लांबविला

रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची पर्स लांबवून अज्ञाताने लाखोंचा ऐवज लांबविला. ही घटना शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. सुमारास भोके ते उक्षी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली आहे. याबाबत महिलेच्या पतीने ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी सायंकाळी ते पत्नीसह दिवा पॅसेंजर रेल्वेने रत्नागिरी ते पनवेल असा प्रवास करीत होते. त्यांची ट्रेन भोके येथे आली असता फिर्यादींना जाग आली, त्यांना आपल्या डोक्याखाली ठेवलेली पत्नीची पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. पर्समध्ये १ लाख २० हजार रुपयांचे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र, ६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ५०० रुपयांचे एअर मशीन, ५०० रुपयांचा जुना मोबाईल, रेशन कार्ड, पासबुक, आधारकार्ड असा एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कायदा कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button