तिरुपती बालाजी मंदिराच्या संपत्तीत यावर्षी मोठी वाढ.
* तिरुपती येथील बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी जगभरातून लाखो भाविक येतात आणि भरभरून दान देतात. सर्व दान स्वरूपातील बाबींची जबाबदारी तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट पाहते.तिरुपती बालाजी मंदिराच्या संपत्तीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे.अहवालानुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानाने यावर्षी 1161 कोटी रुपयांची एफडी केली आहे. बँकांमध्ये जमा केलेली एकूण एफडी 13 हजार 287 कोटींवर पोहोचली आहे. एप्रिल 2024 पर्यंत, तिरुपती ट्रस्टची बँका आणि त्याच्या विविध ट्रस्टमधील रोकड 18 हजार 817 कोटींवर पोहोचली आहे, जी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.वर्षाला मिळतात 1600 कोटीएकीकडे, तिरुपती ट्रस्टला त्याच्या एफडीवर व्याज म्हणून वार्षिक 1600 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळते. दुसरीकडे, ट्रस्टने नुकतेच 1031 किलो सोने जमा केल्यानंतर आता ट्रस्टचे 11329 किलो सोनेही बँकांमध्ये जमा झाले आहे.www.konkantoday.com