रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे असणाऱ्या ज्योतिबा मंदिरात २३ एप्रिल रोजी ज्योतिबाचा जयंती उत्सव.
*रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे असणाऱ्या ज्योतिबा मंदिरात मंगळावर दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी श्री कुलस्वामी ज्योतिबाचा जयंती उत्सव प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वा. कुलदेवतेची पूजा व विडा भरणे, सकाळी ११ वा. आरती, मंत्रपुष्प व प्रार्थना. त्यांनतर दुपारी १२ वा. ज्योतिबा सेवा मंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे. दुपारी १ ते ३ या कालावधीत महाप्रसाद आणि सायंकाळी ५ वाजता गोंधळ असा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संखेने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलंय. ज्योतिबाचा शिधा ज्यांना कोणाला द्यावयाचा असेल त्यांनी दि. २०/०४/२०२४ ते दि. २३/०४/२०२४ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ व सायं. ४ ते सायं. ७ या वेळेत मंदिरात जमा करावा. तसेच ज्या भक्तांना गोंधळाला बसावयाचे असेल त्यांनी आपली नावे श्री. अजय गांधी – ९४२२०५१०३७ श्री. सचिन गांधी ८०९३९३६४६४ या नंबरवर संपर्क साधून द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहेwww.konkantoday.com