वैद्यकीय महाविद्यायाच्या शासकीय रूग्णालयात लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवारांची तपासणीसाठी हेळसांड

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ साठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार अमृत तांबडे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दुरवस्थेचा अनुभव घ्यावा लागत आहे. दिवसभर रूग्णालयात दाखल झाल्यापासून एकही डॉक्टर अथवा वैद्यकीय अधिकारी फिरकलाच नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे इथे हाल होत असल्याचे यावेळी तांबडे यांनी सांगितले.जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच जिल्हा शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेचा प्रश्‍न अद्याप कायमच आहे. आज याच कमतरतेचा प्रश्‍न अद्याप कायमच आहे. आज याच कमतरतेचा फटका खासदारकीचा अर्ज भरलेल्या उमेदवाराला बसला. राजापूर येथे अचानक पोटात दुखू लागल्याने तांबडे यांनी राजापूर ग्रामीण रूग्णालय गाठले. तिथे प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना १०८ या रूग्णवाहिकेने जिल्हा रूग्णालयात आणल्यापासून इथे एकही डॉक्टर रूग्णाला पहायला फिरकला नसल्याचे तांबडे यांनी सांगितले. एकूणच खासदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्याची अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्यांचे हाल न बघण्यासारखे आहेत असेही त्यांनी सांगितले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button