
खालेेल्या ताटात घाण करणारी तुमची अवलाद- खासदार विनायक राऊत यांचे दीपक केसरकर यांच्यावर टीका
* पक्ष बदलूंना पालकमंत्री केले, गृह, अर्थराज्यमंत्री केले. आम्ही, उपाशी राहिलो. पण, तुम्हाला खायला घातले. कृतघ्नता ज्यांच्या रक्तात आहे… ते म्हणजे दीपक केसरकर, असा जोरदार हल्लाबोल करत खासदार आणि महाविकास आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केसरकरांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.सावंतवाडी येथे संस्थानाचे ग्रामदैवत श्री देव पाटेकराचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला.यावेळी खा. राऊत यांनी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना महायुतीच्या नेत्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात प्रचार करण्यापूर्वी राजघराण्यातील देव पाटेकराचे दर्शन मी घेतो. भारतमातेच्या रक्षणासाठी आम्हाला ताकद दे व निवडणुकीत यश दे अशी प्रार्थना, मी श्री देव पाटेकराकडे केली असल्याचे ते म्हणाले.’सत्ता असतानाही खा. राऊत साधे मंत्री होऊ शकले नाहीत!’ अशी टीका मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. या टीकेला खा.राऊत यांनी उत्तर दिले. विरोधकांच्या टीकेला मी जास्त किंमत देत नाही. ‘गिरेे तो भी टांग उपर’ अशी त्यांची अवस्था आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्यावर थेट हल्ला चढवला ते म्हणाले, त्यांच्यासारख्या पक्ष बदलूंना पक्षप्रमुखांनी पालकमंत्री केले,अर्थराज्यमंत्री केले. त्यासाठी आम्ही उपाशी राहिलो पण तुम्हाला खायला घातले. मात्र, खालेेल्या ताटात घाण करणारी तुमची अवलाद आहे. त्यामुळे आमच्यावर बोलायचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. सत्तेसाठी दीपक केसरकर किती लाचार व कृतघ्न होतात हे अवघ्या महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिले आहे. ‘www.konkantoday.com