कोकणात ३३ वर्षानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणाविना निवडणूक होणार
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. १ ऑक्टोबर १९८९ रोजी निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिले. धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेने १९९१ साली प्रथमच महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविली. तेव्हापासून आजमितीपर्यंत शिवसेना म्हणजेच धनुष्यबाण आणि धनुष्यबाण म्हणजे शिवसेना हे समीकरण शिवसेना पक्षावर प्रेम करणार्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून आहे. धनुष्यबाण चिन्हाप्रती असलेली त्यांची ही आत्मीयता आजही कायम आहे. परंतु आज बदललेल्या राजकीय परिस्थितीत रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणातील दोन प्रमुख लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण हे चिन्ह तब्बल ३३ वर्षानंतर दिसणार नाही. कारण महायुतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला या दोन्ही जागा मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि भाजपला सोडाव्या लागल्या आहेत.www.konkantoday.com