पावसमध्ये सव्वा लाखाचा गुटखा जप्तसंशयितावर गुन्हा दाखल

  • पावस-गाडीअड्डा येथे विनापरवाना गुटख्याची वाहतूक करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटार आणि गुटख्यासह ३ लाख ४२ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांनी नाकाबंदी कार्यक्रमांतर्गत केली. संशयिताविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोशन संजय नाईक (वय २६, रा. कासारवेली, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १७) दुपारी पावस-गाडीअड्डा येथे निदर्शनास आली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांनी नाकाबंदी कार्यक्रमांतर्गत सर्वच गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गाड्यांची तपासणी करत असताना पावस गाडीअड्डा येथे पूर्णगड ते पावस अशी जाणारी नाईक यांची मोटार पोलिसांनी थांबवली. वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये गुटख्याची पाकिटे सापडली. २ लाखांची मोटार आणि गुटखा असा ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस करत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button