चिपळूणचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश चव्हाण हे ठरले सुवर्णपदकाचे मानकरी
चिपळूण पोलीस स्थानकात हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणारे रमेश चव्हाण यांनी सायंटिफिक एड टू इन्ह्हेस्टीगेशन स्पर्धेतील पोलीस पोट्रेट या स्पर्धा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. चव्हाण यांच्या रूपाने महाराष्ट्राला तब्बल ६७ वर्षानंतर प्रथमच पदक मिळाले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस दलात कौतूक होत आहे.काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश-लखनऊ येथे ६७ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. मेळाव्यादरम्यान २९ राज्याचे पोलीस प्रतिनिधीत्व करत होते. मेळाव्यादरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती.www.konkantoday.com