राजापूर पालिकेची ८६ टक्के करवसुली

ऑनलाईन सुविधेला प्रतिसाद ; थकबाकीदारांची नावे फलकावर. राजापूर नगर पालिकेने यावर्षी ८६ टक्के करवसुली करण्यात यश संपादित केले आहे. त्यामध्ये घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करभरणा करण्याची सुविधाही पालिकेने उपलब्ध करून दिली होती. त्यालाही करदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना ऑनलाईन पद्धतीने १८ लाख ४५ हजार ६१० तर क्युआर कोडद्वारे ५० हजार ७१८ असे मिळून १८ लाख ९६ हजार ३२८ रुपयांची वसुली झाली आहे. राजापूर पालिकेची करवसुलीची १ कोटी ९८ लाख ४८ रुपयांची मागणी होती. त्यापैकी १ कोटी ७१ हजार रुपयांची वसुली झाली आहे. त्यामध्ये मालमत्ता आणि इतर करांची ८७.२९ टक्के तर पाणीपट्टीची ८१.१६ टक्के वसुलीचा समावेश आहे. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजनबद्द राबवलेल्या करवसुली मोहिमेमुळे पालिकेला करवसुली करण्यात यश आले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button