पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजापुरात २ दोन दिवसाआड पाणी वितरित करण्याचा निर्णय
राजापूर नगर परिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २६ मार्चपासून शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोकण अवलंबले होते. आता मात्र उन्हाळ्यात नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होवू नये म्हणून असलेला पाणीसाठा कमी झाल्याने २० एप्रिलपासून दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी नगर परिषदेने २६ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला.यावेळी राजापूर शहरात २१, २४, २७ व ३० एप्रिल रोजी बाजारपेठ व चव्हाणवाडी विभाग तर २०, २३, २६ व २९ एप्रिल रोजी कोंढेतड व धोपेश्वर घाटी, दिवटेवाडी, खडपेवाडी विभाग, तसेच २०,२२,२६ एप्रिलला आंबेवाडी विभाग तर २०,२३,२६ व २९ एप्रिलला रानतळे विभागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या ठिकाणी विद्युत पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो तेथे वीजपुरवठा खंंडीत झाल्यास त्या भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल केला जाणार आहे. www.konkantoday.com