मी अडीच लाखांच्या रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होणार -नारायण राणेंचा विश्वास
तरूणांच्या हाताला रोजगार, चांगले शिक्षण, मुलाबाळांचे भविष्य उज्ज्वल करायचे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यांना तिसर्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी तुम्हा सर्वांची साथ गरजेची आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन करीत केंद्रीय सुक्ष्म लघु, उद्योग, मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी, अशी आपली सवय आहे. त्यामुळे जिंकलो तर अडीच लाखांच्या मताधिक्क्याने असे वक्तव्य करीत त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीचे आपणच उमेदवार असल्याचा सुतोवाच केला. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, अशी वक्तव्ये केली जात होती. मात्र आता भाजपच्या उमेदवाराला विजयी करा, असे जाहीररित्या आवाहन केले जात असल्याने चर्चांना उधाण आले आहे. www.konkantoday.com