
रत्नागिरी शहरातील वाहतूक सुरळीत होणार,सिग्नल यंत्रणा सुरू
गेले अनेक महिने बंद असलेली शहरातील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलीस यंत्रणेने पाऊले उचलली आहेत. रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील सिग्नल यंत्रणा अनेक वेळा बंद पडत होती. आता ही यंत्रणा सुरू करण्यात येत आहे.सध्या मारुती मंदिर ,जेलनाका विभागातील सिग्नल यंत्रणा सुरू झाली आहे. जयस्तंभ सर्कलमधील सिग्नल यंत्रणा गेले काही वर्षे बंद आहे.आता ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी या सिग्नल दुरुस्तीचे काम सुरू आहे.या सर्व ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू झाल्या तर वाहतुकीला शिस्त येणार आहे. याचा फायदा पादचाऱ्यांनाही होणार आहे.अनेक वेळा पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे धोकादायक होत होते .
www.konkantoday.com