खेर्डी येथे वणव्याच्या आगीत अपरांत कंपनी परिसरातील साहित्य जळून खाक

चिपळूण शहरालगतच्या खेर्डी एमआयडीसीमधील अपरांत कंपनी परिसरात सोमवारी सायंकाळी वणव्यामुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीच्या गोडावूनमधील प्लास्टिकचे साहित्य जळून हजारांचे नुकसान झाले. चिपळूण तसेच लोटे येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने सायंकाळी उशिरा आग आटोक्यात आली.खेर्डी एमआयडीसीतील या कंपनीत प्लास्टिक बाटल्या व अन्य साहित्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो. त्यासाठी जुन्या प्लास्टिक वस्तूंची खरेदी केली जाते. यामुळे कंपनीच्या गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा करण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी अचानक कंपनी परिसरात वणवा लागल्याने गोडावूनमधील साहित्य जळून खाक झाले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button