लांजा आगाराची पाचलमार्गे भुईबावडा-रत्नागिरी एसटी फेरीच्या वेळेत अनियमितपणा
मागील २ वर्षापासून लांजा आगाराची पाचलमार्गे रत्नागिरी-भुईवाडा ही गाडी सुरू आहे. मात्र ही गाडी अनियमितपणे सुरू असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवासी जनतेमधून कमालीचा संताप तथा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी विभाग नियंत्रक रत्नागिरी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.वैभववाडी व राजापूर पूर्व भागातून थेट पाचलमार्गे रत्नागिरीला जाणारी ही एकमेव एसटी आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारी ही गाडी असल्याने या गाडीला भारमान पण चांगले आहे. तसेच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र ही गाडी नियमितपणे सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. लांजा आगाराच्या या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे एसटीच्या या कारभाराबाबत प्रवाशांमधून सताप व्यक्त होत आहे. विभाग नियंत्रक, रत्नागिरी यांनी ही गाडी नियमिपणे सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.वैभववाडी व राजापूर पूर्व भागातून थेट पाचलमार्गे रत्नागिरीला जाणारी ही एकमेव एसटी आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारी ही गाडी असल्याने या गाडीला भारमान पण चांगले आहे. तसेच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र, ही गाडी नियमितपणे सुरू नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. लांजा आगाराच्या या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे एसटीच्या या कारभाराबाबत प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. विभाग नियंत्रक, रत्नागिरी यांनी ही गाडी नियमितपणे सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. www.konkantoday.com